✒️ गजानन लांडगे यवतमाळ(Yavatmal प्रतिनिधी)
यवतमाळ (दि.18 ऑगस्ट) :- इंडीयन ऑलिम्पियाड (ड्रॉव्हिंग) स्पर्धेत मध्ये रिया अमोल वानखेडे हिने आपल्या अंगी असलेल्या कलाभुत गुणाच्या आधारे गोल्ड मॅडल पटकाविले आहे.
महागाव येथील श्री कॉम्प्युटर चे संचालक मंगेश पाटील वानखेडे यांची पुतणी तसेच आमणी येथील प्रियदर्शनी कॉन्व्हेन्ट मध्ये ३ऱ्या वर्गात शिकत असलेली कु.रिया अमोल वानखेडे या विद्यार्थिनीने इंडीयन ऑलिम्पियाड स्पर्धेतील चित्रकला स्पर्धेत भाग घेत आपल्या कुंचल्यांच्या माध्यमातून अतिशय मनमोहक रेखाटलेले चित्र परीक्षकांच्या पसंतीस उतरल्याने तिच्या कलागुणांचे कौतुक करून परीक्षकांनी बक्षिसासाठी तिची निवड केली असुन या स्पर्धेत तिने राज्यात तिसरा क्रमांक मिळवुन यश संपादन केले याबद्दल तिला स्वातंत्र्यदिनी अभिषेक राठोड यांनी गोल्ड मॅडल व शिष्यवृत्तीचा धनादेश देवुन तिचा गुणगौरव केला.
तिच्या यशाबद्दल जनआंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे,प्रियदर्शनी कॉन्व्हेन्टच्या अध्यक्षा श्रीमती वनमालाताई राठोड ,शिक्षक,आजोबा दादाराव वानखेडे, अजी सुरेखा वानखेडे, वडील अमोल वानखेडे, आई रविता वानखेडे, काका मंगेश वानखेडे, कल्याणी वानखेडे व नातेवाईकांनी अभिनंदन करून कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.