🔸भूमिका घेताच प्रशासनाची उडाली तारांबळ
✒️शिरीष उगे वरोरा ( Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.3 नोव्हेंबर) :- काँग्रेसच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कुलूप बंद आंदोलन पुकारले आहे.
यावेळी वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची थ्री फेज लाईन बंद असून शेतीच्या हंगामात चना लागवडीसाठी महत्त्वाची बाब ठरते. त्यामुळे तात्काळ थ्री फेज लाईन सुरु करावी अशी मागणी करत भद्रावती वरोरा विधानसभेचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला कुलूप बंद करून आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत वरोरा तालुक्यातील थ्री फेज लाईन सुरु करत नाही तोपर्यंत आंदोलन करणार अशी भूमिका घेतल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांसह आमदार प्रतिभाताई धानोरकर विद्युत विभागाच्या आवारात बसून कुलूप बंद केल्यानंतर त्यांनी चावी स्वतःच्या हातात ठेवलेली होती त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. आणि कर्मचारी कुलूप बंद रूम मध्ये बसून होते. आमदार धानोरकर आपल्या मागणीवर रेटून धरून असून भद्रावती खांबाडा या भागात थ्री फेज लाईन सुरू आहे. मात्र वरोरा क्षेत्रातील काही भागातील शेतकऱ्यांनी कोणते पाप केले असा प्रश्न वरिष्ठ समोर उपस्थित करताच अधिकारी निरुत्तरित झाले.
वरोरा येथील अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून लवकरच थ्री फेज लाईन सुरू करणार अशी ग्वाही दिली होती. मात्र बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने आज आमदार धानोरकर यांनी कुलूप बंद करून ठिय्या आंदोलनाचा पवित्रा उचलला होता. स्वतः कार्यकर्त्यांसोबत विद्युत वितरण कंपनीच्या आवारात त्या बसल्याने सर्व शेतकरी त्यांच्या बाजूने आहे. जोपर्यंत अधिकारी निर्णय घेणार नाही तोपर्यंत या ठिकाणावरून न उठण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. याप्रसंगी अधिकाऱ्यांनी वरिष्ठाशी संपर्का साधला असता त्यांनी दोन दिवसा च्या कालावधीत थ्री फेज लाईन सुरु करू असे सांगितले. आमदार यांनी दोन दिवसात लाईन नाही सुरु केली तर दोन दिवसा नंतर आम्ही जिल्हा कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात राजू चिकटे, बसंत सिंग, शुभम चिमूरकर, विलास टिपले, मनोज दानव, विशाल बेदखल, राजू महाजन, प्रवीण काकडे, यशोदा खामनकर, किशोर डुकरे, प्रमोद काळे आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.