आर्थिक समृद्धीसाठी पारंपारिक शेतीसोबत शेतकऱ्यांनी चंदनाची शेती करावी…डॉ. अजय पिसे

🔹आम आदमी पार्टी तर्फे शेतकऱ्यांसाठी प्रत्येक रविवारी मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.17 जुलै) :- आपला शेतकरी हा पूर्णतः पारंपारिक शेती व निसर्गावर अवलंबून असल्यामुळे अजूनही आर्थिक समृद्ध झालेला नाही. शेतकरी हा शेतीमध्ये जीवतोड मेहनत करत असतो परंतु त्याच्या मेहनतीचा मोबदला हा कधीच भेटत नाही. मागील अनेक वर्षांपासून आम आदमी पार्टी तर्फे शेतकऱ्यांसाठी चंदनाच्या शेतीवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्या लोकांनी चंदनाचे झाड लावले ते झाड आज चांगले मोठे झालेले आहेत व येणाऱ्या काही वर्षातच त्याचा चांगला आर्थिक मोबदला मिळू शकतो.

पारंपारीक शेतीसोबतच शेतकऱ्यांनी चंदनाची शेती केल्यास दहा ते बारा वर्षात चंदनाचे एक झाड हे अंदाजे दहा लाख रुपये कमवून देवू शकते. अडचणीच्या वेळेस चंदनाच्या झाडावर कर्ज उपलब्ध होऊ शकते तसेच झाडाचे इन्शुरन्स केले जात असल्यामुळे चोरीची भीती नाही. तीन वर्षावरील चंदनाच्या झाडाची पाने ही उच्च प्रतीचा चहा उत्पन्नासाठी वापरला जातो. चंदनाचे झाड हे आपल्या घरी किंवा बांधावर लावल्या जाऊ शकते. उज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांनी दरवर्षी कमीत कमी दहा चंदनाची झाडे लावायची सवय लावावी यामुळे मुलांच शिक्षण, लग्न व म्हातारपणाच्या आपल्या आरोग्याची सोय होईल असे प्रतिपादन प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी केले.

शेतकऱ्यांनी चंदनाची शेती करावी यासाठी आम आदमी पार्टी तर्फे चिमूर-नागभीड विधानसभेत प्रत्येक रविवारी मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. यामध्ये चंदन रोप तयार करणे, झाडाची निगा, आर्थिक नियोजन, विक्री व्यवस्था यावर मार्गदर्शन करण्यात येईल. या शिबिराला नोंदणी करण्यासाठी आपण आपल्या भागातील आम आदमी पार्टी संपर्क प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी या उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता आम आदमी पार्टी चे विलास दिघोरे, योगेश सोनकुसरे, विशाल इंदोरकर, नानक नाकाडे, आदित्य पिसे, प्रवीण चायकाटे, दिनेश मसराम, मधुकर सूर्यवंशी, अशोक रामटेके, नितेश तुमराम , मुकेश मसराम, खुशाल कासार, पवन पिसे, प्रदीप तुळसकर, मंगेश शेंडे प्रयत्नरत आहेत.