🔹तालुक्यात १५ हजार लोकांची डोळे तपासणी तर ८ हजार लोकांना विनामूल्य चष्मे वाटप
✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.7 ऑक्टोबर) :- समाजकार्या विषयी जिद्द समाजाप्रती निर्माण झालेली ओढ काहींना कोणत्याही परिस्थिती शांत बसू देत नाही आपले जीवन गरजूंच्या कामी यावे आपल्या डॉक्टरी पेशाचा जास्तीत जास्त रुग्णांना लाभ व्हावा या उदात्त आणि सेवाभावी वृत्तीने डॉक्टर चेतन खुटेमाटे यांनी वरोरा भद्रावती तालुक्यातील जवळपास 15000 लोकांची डोळे तपासणी केली असून आठ हजार लोकांना विनामूल्य चष्मे वाटप केले आहे.
विदर्भातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ असलेले डॉक्टर चेतन खुटेमाटे गुरुदृष्टी नेत्रालय चा माध्यमातून चला बदल घडवूया ही मोहीम राबवत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून त्यांनी वरोरा-भद्रावती तालुक्यातील खेमजई, खांबाळा, माढेळी, माजरी चंदनखेडा, टेंमुर्डा, चारगाव, विजासन(भद्रावति), शेगाव अशा अनेक गावा गावात जाऊन तिथे विनामूल्य कॅम्पचे आयोजन करीत आहेत.
डॉक्टर आणि आपल्या चमुच्या माध्यमांतून त्या गावातली आणि परिसरातील रुग्णाचे डोळे तपासणी करुन चष्मे वाटपाचे काम गेल्या अनेक महिन्या पासून अविरत करीत आहेत.परिसरात पंधरा हजार रुग्णांची विनामूल्य डोळे तपासणी करून त्यातील आवश्यक असलेल्या आठ हजार रुग्णांना त्यांनी चष्मे वाटप केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून मार्गदर्शन शिबिरे घेण्याची काम ती करत आहे.
विशेष म्हणजे डॉ. चेतन खुटेमाटे यानी गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात जाऊन असे विनामूल्य काम कित्येक वर्षापासून ते घेत आहे. आपल्या हातून ग्रामीण भागातील रुग्णाची सूशुषा व्हावी आरोग्य सेवेतूनच ईश्वरसेवेचा ध्यास घेणाऱ्या डॉक्टर चेतन खुटेमाटे यांचे सर्व स्तरातून कौतुक होतांना दिसून येत आहे.