आयुष्यात जर आनंदीत राहायचं असेल, तर हसण्याच आणि जगण्याचं कारणं शोधा _ अभिनेता राजेश आनंदा गायकवाड If you went to be happy in life,find reasons to laugh and live -actor Rajesh Ananda gaikawad 

✒️ सुनिल भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.3 एप्रिल) :- अभिनेता राजेश आनंदा गायकवाड यांची मुलाखत मुंबई कल्याणमध्ये मध्ये राहत्या घरी घेतली त्यावेळी त्यांनी कलाक्षेत्रातील जीवन प्रवास कथन केला.

माझं स्वप्न होत काहीतरी करून जॉब किंवा कलाक्षेत्रात जाऊन आई वडिलांचे नाव रोशन करायचं होत म्हणून मी एक विनोदी कलावंत आहे. ” माझा जन्म दिनांक १७/११/१९७० रोजी मुंबई येथे झाला पण बालपण गांवी (सातारा) येथे गेले. आमच्या गांवी विठाबाईचा व काळु बाळूचा तमाशा यायचा, त्यातील बतावण्यांची आवड तेव्हापासून लागली.

म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षापासून, पहीली ते सातवी पर्यंत माझे शिक्षण गावीच झाले. गावी आजीने माझा सांभाळ केला. नंतर आई वडिलांनी आठवीला मुंबईला घेऊन आले. पण अभ्यासामध्ये माझे काही मन लागायचे नाही.. कशीतरी रडत खडत दहावी केली. वडीलांनी ओळखले की, हयाचे काय अभ्यासामध्ये मन लागेल असे काही दिसत नाही. मग त्यांनी मला आय. टी. आय. ला टाकले. त्यावेळेस आम्ही खार येथे राहात होतो. आय. टी. आय. करत असतांना बाबांनी श्रीनगर (ठाणे) येथे आय. टी. आय. च्या सोसायटी मध्ये रुम विकत घेतले .

कारण बाबा आय. टी. आय. मध्ये फोरमन पदावर कार्यरत असताना त्यानी श्रीनगर मधे आई टी आई च्याच बिल्डिंगमध्ये रूम घेतलं आणि मझ्या वडिलांची फॅमिली आणि चुलत भावंडं ठाण्यामध्ये रहायला गेलो. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने माझ्या अभिनय कला क्षेत्राला सुरुवात झाली. वर्ष होते १९९२ गणेशोत्सवाचे दिवस होते. त्या वेळेस श्रीनगरचे नगर सेवक श्री मनोज शिंदे यांनी मविस कलामंच नावाची संस्था उघडली. माझा मामे भाऊ खुप चांगला लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता होता. हेमंत भा. शिंदे त्यांचे नाव . त्यांची एकाकी का ते बसवत होते. “कथा नाटकाच्या तालमीची” तालीम सुरु झाली.

त्यावेळेला मी ती तालिम बघायला जायचो, विनोदी एकांकिका होती. नाटक अर्ध्या पर्यंत बसले असताना त्यातील नंदया पात्र करणारा मुलगा ते नाटक सोडून गेला तेव्हा हेमंत भाऊ म्हणाले राजेश तु करशील का . मला लहानपणा पासूनच आवड असल्यामुळे मी लगेच हो म्हटल. नाटक पुर्ण झाले, गणपती मध्ये शो केला. ते लोकांना तुफान आवडले, मग आम्ही बऱ्याच एकांकीका स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्यात बऱ्याच स्पर्धामध्ये उत्कृष्ठ अभिनयांच बक्षिस देखील मिळाले.

आणि त्याचे सांगळे श्रेय माझ्या गुरुना म्हणजे माझे मामे भाऊ हेमंत शिंदे व विरेश कांबळी यांना जाते. आणखीन एका व्यक्तीला विसरुन चालणार नाही. आणि ती व्यक्ती म्हणजे राजशे सारंग. आम्ही कथा नाटकांच्या तालमीची हे नाटक करत असतांना त्यांच्याशी माझी ओळख झाली. हेमंत भाऊंचा मित्र आणि आता माझा तो अगदी जिवलग मित्र. त्याने नंतर मला विनायक पडवळ सरांची रॉयल अॅकॅडमी नावाची संस्था होती, तिथे तो मला घेऊन गेला .. वर्ष होते १९९३. नंतर त्या संस्थे मधून काम करु लागलो.

गिरीष साळवी, नंदकिशोर चौगुले, मंगेश साळवी, राजेश सारंग, अरुण कदम, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर अशा दिग्गज कलावंतांचा भरणा असलेल्या संस्थेमधून काम करायला मिळाल मी माझा भाग्य समजतो. नंतर त्या संस्थे मधे काम करत असताना जब्बार पटेल..दिलीप प्रभावळकर.. प्रभाकर पणशीकर.. शफाज खान.. विजय चव्हाण इत्यादी बिग दिग्गज कलावंतांचे मार्गदर्शन लाभले.. १९९३ पासून ते १९९८ पर्यंत त्या संस्थेमध्ये काम केले. त्या संस्थे मधून बऱ्याच एकांकीका केल्या. नंतर १९९८ ते २००० हया कलावधी दरम्यान थोडासा गॅप पडला. १९९८ मध्ये रिझवी इंजिनियरींग कॉलेज मध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून जॉब लागला.

कारण आमच्या संस्थेचे सर्वे सर्वा विनायकड पडवळ सर नेहमी म्हणायचे, कला जोपासा पण प्रपंच सांभाळून, २००० मध्ये माझं लग्न झाले, फक्त घर अणि नोकरी, नोकरी आणि घर फक्त एवढच, पण अंगामधला कलाकार काही स्वस्थ बसू देईना. पुन्हा एकदा अभिनय क्षेत्राकडे वळलो. असाच एकदा ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे फेरफटका मारायला गेलो होतो, कारण गडकरी रंगायतनच्या जवळच माझी सासुरवाडी, तर सांगायचा मुददा अस की, मी गडकरीला गेलो असतांना तिथे देवेन बच्छाव नावाच्या व्यक्तीशी माझी ओळख झाली. त्यांचे वेगवेगळे प्रोजेक्ट चालु असायचे. त्यांच्या श्रावस्थी नावाच्या संस्थेमधून काम करु लागलो. त्यांच्या एकांकीकांना दिग्दर्शन करु लागलो.

त्याच दरम्यान तो पथ नाटयाचे घ्यायचा. तेव्हा पासून म्हणजे २००१ पासून पथ नाटय करायला सुरुवात केली. त्यावेळेला संदेश अहिरे, सलीम शेख, संदीप नाईक, विजय सुलताने, समीर खरात इत्यादी गुणी कलावंताची भेट झाली. एकांकीका पथनाटय करत असताना संदेश मला बोलला कि, सर तुम्ही एखादं नाटक का नाही लिहित, मला त्यावेळेस विनोदी किस्से लिहिण्याची खूप आवड होती.

मग मी व्यवसाईक नाटक “खोटयाचा बोलबाला’ हे नाटक, ते जवळ जवळ लोकनाटयच होत. त्यात जवळ जवळ चौदा पंधरा कलाकार होते, त्याचे दिग्दर्शनही मीच केले होते. त्याचे शो खुप कमी झाले. नंतर मी “कथा नाटकाच्या तालमीची” हया एकांकीकेची व्यवसायीक नाटकामध्ये रुपांतर केले. ” फक्त एक चान्स “त्याचे दिग्दर्शन सदेश अहिरेने केले. त्याचे जवळ जवळ सतरा प्रयोग केले, हे चालु असताना पथ नाटयाचे शो तर चालुच होते. त्याचे आतापर्यत ९००० शो केले.

पथनाटय करत असताना २०१० मध्ये महादेव सुर्यवंशी, करिष्मा वाघ, प्रसाद सावंत, अजय कलढोणे, माधवी सावर्डेकर अशा गुणी कलावंताशी ओळख झाली. त्यांच्या कडून पण भरपूर शिकायला मिळाले. वयानी जरी ते लहान होते तरी ते माझे गुरुच आहेत. असं मी मानतो. अजय कलढोणेने तर लावणीचे शो मध्ये बतावणीसाठी पहिला चान्स दिला. पण बतावणी करत असताना मला बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागले .

लावणी शो ची सुरुवात ऑपरेटर पासून सुरू झाली.ऑपरेटर त्यावेळेस मानधन 200/- होते. पण नंतर अजयने हळु हळु निवेदन कसे करायचे हे शिकवलं. तेव्हा तो, दिनेश कोयंडे आणि दिवव्येश शिरवनकर हयाचे वेळो वेळी मला मार्ग दर्शन लाभल. तेव्हा हया तिघांना मी माझे गुरु माणतो. २०२० पर्यत सर्व अगदी सुरळीत चालु होते. पथनाटय चालु होते, लावणी शो व महाराष्ट्राची लोकधाराचे शो चालू होते, त्यामध्ये निवेदन, बतावणी व कॅरेक्टर करु लागलो.त्यात भर म्हणून सिंगींग पण करु लागलो.

मी हया अभिनय क्षेत्रात येण्यामागे माझे आई वडील, मोठा भाऊ, माझ्या तीन लहान बहीणी, खास करुन माझी साथ बायको मनिषा हिचा मोठा पाठींबा मिळाला आणि जिथे मी सध्या काम करतो त्या माझ्या के.जे. सोमय्या आय. टी. ॲण्ड इंजिनियरींग कॉलेजचा खुप मोठा पाठींबा लाभला.

पण २०२० मध्ये कोरोनाचे संकट आले आणि संपुर्ण जग थांबल, सगळे शेज बंद झाले, पण २०1९ मध्ये थोडा दिलासा मिळाला, लॉकडाऊन थोडया प्रमाणात शिथील झाले, शो बद होते पण शुटींग चालु झाले होते. त्यात काष्टींग डायरेक्टर संतोष तेली हयाची खुप मोठी मदत झाली. त्यांनी लॉकडाऊन मध्ये बऱ्याच सिरीलय मध्ये काम करायची संधी दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर, देव पावला, बाळू मामा, मन उडु उडु झांल, अबोली, ठिपक्यांची रांगोळी, आई कुठे काय करते इत्यादी आणि आता म्हणजे २०२३ मध्ये संगळ सुरळीत सुरु झालंय शो सुरु झालेत, पथनाटय सुरु झालेत, सिरीअल तर मधुन मधुन सुरुच आहेत.

पुढे अशीच यशस्वी वाटचाल चालू राहू दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना.