✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravti प्रतिनिधी)
भद्रावती (दि.2 मार्च) : – गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील आयुध निर्माणी परिसर तथा लगतच्या पिपरबोडी गावात धुमाकुळ घालून नागरिकांत आपली दहशत पसरविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर भद्रावती वनविभागाला यश प्राप्त झाले.
दिनांक 2 रोजीशगुरुवारपहाटेच्या सुमारास सेक्टर 5 या ठिकाणी हा बिबट्या आयुध निर्माणी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आलेले भक्ष खाण्यासाठीआला आणी अलगद अडकला.सदर बिबट्या जेरबंद झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.गेल्या पंधरा दिवसांपासून या बिबट्याने निर्माणी वसाहत व लगतच्या पिपरबोडी गावपरिसरात धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने आजपर्यंत चार जणांवर हल्ला करुन त्यांना किरकोळ जखमी केले होते.
या परिसरातील पाळीव प्राण्यांवरही या बिबट्याने हल्ले केले होते.बिबट्याच्या या ऊपद्रवामुळे परिसरातील नागरीक,लहान मुले तथा पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झाला होता. बिबट्याची परिसरातील दहशत लक्षात घेता या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी भद्रावती वनपरिक्षेत्राकडे केली होती. याची दखल घेत व निर्माणी वसाहतीत गेल्या पाच दिवसांपासून पांचपिंजरे लावण्यात आले होते व त्यात नियमीत भक्ष ठेऊन यावर नजर ठेवण्यात आली होती.
अखेर निर्माणी वसाहतीत लावण्यात आलेल्या एकपिंजऱ्यात हामादा बिबट्या अडकला हा मादा बिबट 18 महिन्याचे असून.सदर याला गंदा नाला परिसरातील नर्सरीत ठेवण्यात आले असुन त्याला त्याच्या सुरक्षीत अधिवासात सोडण्यात येणार आहे.सदर कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे यांच्या नेतृत्वात क्षेत्रसहाय्यक विकआस शिंदे सहाय्यक वनसंरक्षक निखीत चौरे आदेश कुमार शेडगे अंकुश येवले यांनी केले.