आम आदमी पार्टीकडून चंद्रपूर जिल्ह्यात 2024 विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचे आवाहन – ऑनलाइन नोंदणी सुरू

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.19 जुलै) :- आम आदमी पार्टी (आप) महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार असून, चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात येत आहे. या निमित्ताने, पक्षाकडून उमेदवारी इच्छुकांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीच्या उमेदवारांसाठी अनुकूल वातावरण आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, पक्षाचे प्रतीक असलेले ‘झाडू’ चिन्ह जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचले होते. त्या निवडणुकीत झाडू चिन्हावर 2 लाखांहून अधिक मतदान झाले होते, जे पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेचे द्योतक आहे.

आम आदमी पार्टी हा शिक्षण, आरोग्य, वीज पुरवठा आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसह मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणारा एक मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

“चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. 2014 च्या निकालांवरून स्पष्ट होते की जिल्ह्यात आमच्या पक्षाला मोठा पाठिंबा आहे. आम्ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या ऐतिहासिक संधीचा लाभ घ्यावा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आम आदमी पार्टीमध्ये सामील व्हावे,” असे आवाहन श्री. मयूर राईकवार, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांनी केले आहे.