आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसील कार्यालय चिमूर शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न

✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी) 

चिमूर(दि.15 ऑगस्ट) :- आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चिमूर किशोर घाडगे सर यांच्या हस्ते ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रशासकीय भवन : तहसील कार्यालय चिमूर येथे शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. 

याप्रसंगी आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी तिरंगा राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्व पणाला लावून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व क्रांतिवीरांना विनम्र अभिवादन केले. तसेच, चिमूर क्रांती संग्रामातील शहीद वीरांच्या कुटुंबियांना सन्मानित करून ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला. या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून सर्वांना ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया.यांचे पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले.

तसेच, राजीव गांधी सभागृहात आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया.यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करीत सन्मानित करण्यात आले. या ध्वजारोहण सोहळ्याला प्रामुख्याने प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चिमूर किशोर घाडगे सर, तहसीलदार चिमूर श्रीधर राजमाने सर व अन्य प्रशासकीय अधिकारी तथा कर्मचारी तसेच, विविध भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.