आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या शुभहस्ते श्री गुरूदेव सेवा मंडळ, चिमूर येथे ५० लक्ष रुपयांच्या सामाजिक सभागृह बांधकामाचा शुभारंभ

✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी) 

चिमूर(दि.9 ऑगस्ट) :- आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या शुभहस्ते श्री गुरूदेव सेवा मंडळ, चिमूर येथे खनिज विकास निधी सन २०२४-२५ अंतर्गत ५०.०० लक्ष रुपयांच्या सोयी-सुविधायुक्त सामाजिक सभागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. दरम्यान, समस्त गुरुदेव भक्तांच्या वतीने *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांचे पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करीत आभार व्यक्त करण्यात आले. 

याप्रसंगी आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी प. पू. समर्थ आडकोजी महाराज, प. पू. माता मंजुळादेवी व ब्र. वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या अधिष्ठानाला माल्यार्पण करून दर्शन घेतले आणि सर्व संत महात्म्यांना विनम्र अभिवादन करुन समस्त गुरुदेव भक्तांना विविध विषयांवर संबोधित केले. 

या भूमिपूजन सोहळ्याला श्री गुरुदेव सेवा मंडळ, चिमूर कार्यकारिणी – ग्रामसेवाधिकारी वसंतराव कडू गुरुजी, उप. ग्रामसेवाधिकारी बाबाराव दोहतरे, सचिव परमानंद बोरकर सर, कोषाध्यक्ष दिलीप राचलवार, प्रचार संघटक भक्तदास जिवतोडे, सदस्यगण – मारोतराव अतकरे सर, प्रकाशबापू बोकारे, कमल असावा, कृष्णा तपासे, रमेश भानारकर सर, सचिन वैद्य, प्रभाकर पिसे, देविदास मेश्राम, रविंद्र कापसे, पुंडलिक गायधनी, गजानन दडमल, श्रीराम कोसुरकर, डॉ. अनिलजी भार्गव, गिरीधर केळझरकर तसेच, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजपा तालूका महामंत्री हेमराज दांडेकर, भाजपा युवा नेते समीर राचलवार, सं.गां.नि.अ.यो. समिती चिमूर अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश बोकारे, भाजपा ज्येष्ठ नेते गिरीष भोपे, भाजपा अल्पसंख्यांक आघाडी तालुकाध्यक्ष कलीम शेख, भाजपा नेते अर्जुन पाटील थुटे, भाजयुमो शहर महामंत्री अमित जुमडे, भाजयुमो शहर महामंत्री श्रेयश लाखे, भाजयुमो शहर महामंत्री निखिल भुते, भाजयुमो नेते पंकज मालोदे, भाजपा युवा नेते नरेंद्र हजारे, भाजपा युवा नेते मनी रॉय, भाजपा बूथ अध्यक्ष करण चावरे, गुरुदेव सेवक – गजाननजी शिंदे, प्रशांत पचारे, निलम पचारे, सुभाष बैनलवार, लक्ष्मण पचारे, दिवाकर मोहिनकर, सुनील भट, कृष्णा पचारे, दर्शन पचारे व अन्य मान्यवर आणि गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.