✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी)
चिमूर(दि.20 ऑगस्ट) :- शेतकरी भवन येथे आयोजक डॉ.सतिश वारजुकर राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समनव्यक चिमूर विधानसभा व्यापारी मंडळ स्नेहमिलन सोहळा व आभार समारंभ आणि स्वप्निल बांसोड प्रस्तुत ऑर्केस्ट्रा देश भक्ती गीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या प्रसंगी गडचिरोली चिमूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेव किरसान.यांना चिमूर येथील व्यापारी असोसिएशन मंडळ चे सचिव श्री. बबन बंसोड उपाध्यक्ष श्यामजी बंग आणि सदस्य आणि बालाजी महाराज बहुउद्देशीय व्यापारी मंडळ अध्यक्ष श्री.प्रकाशजी बोखारे सचिव सारंग दाभेकर , व सदस्य , आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.विशाल गंपावार व सदस्य , जिल्हा कुर्ती समिती अध्यक्ष श्री.नरेंद्र बंडे व सदस्य यांच्या तर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. आणि माजी आमदार तथा प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ.अविनाशभाऊ वारजुकर यांना (१)चिमूर किराणा संघटनेचे उपाध्यक्ष श्री.आशिष असावा,रवींद्र अगदे , व सदस्य यांच्या तर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. (२)आणि चिमूर येथील चिमूरचे आवाज संपादक श्री.विनोद शर्मा बार अससिएशनच्या मनिष नंदेश्वर,राकेश नंदुरकर, माजी उपसरपंच बाळकृश्ण बोभाटे,अविनाश अगडे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमचे आयोजक डॉ.सतिशभाऊ यांना व्यापारी असोसिएशन मंडळचे सचिव श्री बबन बंसोड यांनी पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी आणि चिमूर येथील शहीद झालेले तरुण बालाजी रायपूरकर यांच्या घराण्यातील रायपुरकर यांना मान.खासदार डॉ नामदेव किरसान साहेब ,डॉ.अविनाशभाऊ वारजूकर साहेब, प्रा. राम राऊत सर, डॉ.सतिशभाऊ वारजूकर साहेब, आणि तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आले .
यावेळी प्रस्ताविक डॉ.सतिश वारजुकर यांनी केला मान.खासदार साहेब यांना प्रस्ताविकच्या माध्यमातून चिमूर येथे अत्यावश्यक गरजू असलेल्या बाबत सूचना करण्यात आले. या गावात सौचालाय नाही, शिक्षण घेण्याकरिता पाहिजे असे कॉलेज नाही, चिमूर आगारला बससुद्धा प्रमाणिक नाही, उपजिल्हा रुग्णालयात पाहिजे अशी सुविधा नाही असे अनेक विषय माडण्यात आले जर चिमूररात चांगले प्रमाणे सोई सुविधा झाली तर येथील व्यापार वाढेल असे अनेक प्रश्न व्यापारी लोकांना हिताचा मांडण्यात आले व डॉ.नामदेव किरसान यांनी आपले मनोगत व्यक्त केले की या आपले चिमूर येथे पाहिजे अशी सवलत दिसत नाही.
या गावसाठी या आगोदर १० वर्षापासुन स्त्तेत असलेले यांनी असा कोणताही विचार केलेला नाही.सदा उपजिल्हा रुग्णालय आहे. परंतु पाहिजे अशी सवलत मिळतांनी दिसत नाही.या गावाची जिल्ह्याची मागणी आहे.आणि जिल्हा देणे राज्य सरकारकडे असतो आम्ही हा विषय केंद्रात बोललो परंतु त्यांनी सांगितला की जिल्हा देना राज्य सरकारचा काम आहे. असे अनेक प्रश्न आहेत नाही जरी जिल्हा दिला तुम्ही तर जिल्यात ज्या सुविधा असते ती सुविधा इथे द्या असे विषय आम्ही सुचविले आहे.
या करिता मी राज्याचे मुख्यमंत्री यांची वेळ मागितली आहे .आणि आम्ही नक्की या श्रेत्रकरिता या गावकरिता बोलू आणि काम. खिचून आणू असे आपले मनोगत व्यक्त केले,आणि आपण मला लोकसभा निवडणुक जिंकण्यारिता मेहण्यात घेतला त्याबद्दल व्यापारी यांचे आभार मानले त्याच बरोबर महिला यांनीसुद्धा घरो घरी जाऊन मला निवडून आण्याकरिता सहकार्य केले त्यांचासुधा आभार मानले नंतर व्यापारी यांनी स्वतः खासदार साहेब यांच्याशी वयक्तिक चर्चा केली व्यापारी यांनी चिमूर वरोरा ई ३५३ रोड खूब खराब होऊन आहे गेल्या १० वर्ष पासुन रोडचा काम सुरू आहे.
अजून पर्यंत झालेला नाही आहे.या बाबत खासदार साहेबाना येथील व्यापारी यांनी सूचना दिली यानंतर डॉ.विजय गावंडे पाटील अध्यक्ष तालुका काँग्रेस यांनी सर्व उपस्थित व्यापारी व आयोजक आणि सहकारी यांचे आभार मानले असून संपूर्ण व्यापारी, व महिला उपस्थित होते.