✒️ सुनील भोसले पुणे(Pune प्रतिनिधी)
पुणे (दि.20 जून ) :- खाकी वर्दीतील विठ्ठल आदिवासी पाड्यावर भेटीला पुणे शहर चे पोलीस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा हे ऊरुळी कांचन येथे आले होते .
जिल्ह्यातील आदिवासी व भटके विमुक्त गरीब कुटुंबातील तरुणांनी शिक्षणावर भर द्यावे जंगल संस्कृतीमधुन बाहेर पडून स्पर्धा परीक्षेत उतरावे असे मत पुणे शहर चे आप्पर आयुक्त रंजनकुमार शर्मा साहेब यांनी व्यक्त केले ते आज आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांच्या मातोश्री ची भेट घेण्याकरता उरुळी कांचन येथे आले होते आप्पर आयुक्त पुणे शहर मा. रंजनकुमार शर्मा साहेब यांनी आदिवासी पारधी समाजातील आदर्श माता शेवराबाई ज्ञा भोसले यांच्या चर्चा केली.आज महाराष्ट्र मध्ये विविध जिल्हा मध्ये पोलीस अधीक्षक पदावर काम करताना वेगवेगळे अनुभव आले.
अहमदनगर जिल्हा पोलीस अध्यक्ष पदावर कार्यरत असताना आदिवासी पारधी समाजासाठी साहित्यिक.नामदेव भोसले यांच्या संकल्पनेतून पोलीस भरती प्रशिक्षण कार्यक्रम घतले होते या प्रशिक्षणाचा फायदा तेथील तरुणांना झाला अशाच प्रकारे जर तरुणांनी मिळेल तिथे नोकरी करणे आज काळाची गरज आहे या आदिवासी समाजातील बेरोजगार तरुणांना कंपन्यांमध्ये लावण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू तसे आदिवासी समाजामध्ये असुन देखील नामदेव भोसले यांचे काम सर्वच घटकांसाठी पेरणादायी आहे,
असे ते बोलत होते.. यावेळी यावेळी आदर्श माता शेवराबाई ज्ञा भोसले व ज्येष्ठ लेखक भास्कर भोसले आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले, तसेच उरुळी कांचनचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र टिळेकर, कृषी आदर्श पुरस्कार प्राप्त बाळासाहेब चौरे, पोपटराव ताम्हणे, रियाज मणियार, शिंदेवाडी चे ग्रामपंचायत सदस्य तुषार भोसले, ,स्वप्रित भोसले,सौ शोभा भोसले, सौ गौरी भोसले,ग्रामपंचायत सदस्य आश्र्वीनी भोसले हे उपस्थित होते…