आदर्श शिक्षक फिरोजशहा यांचा वाढदिवस साजरा 

✒️ सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.18 सप्टेंबर) :- मैत्री म्हटलं की प्रेम ,आपुलकी, जिव्हाळा आलाच.आजच्या धावपळीच्या जीवनात आणि डिजिटल दुनियेत न रमता आपल्या मित्रांना वेळात वेळ काढून शुभेच्छा देणारे मित्र प्रेमी बोटावर मोजणारेच . परंतु शिक्षकी पेशातिल हे मित्र मात्र वेळात वेळ काढून काही वेळ मैत्री निभावल्या साठी जमा होतात.

मग काय संसारातील गप्पा रंगतात तर भुतकाळातिल आठवणी पुन्हा जाग्या होतात. तर कधी देशाचा विचार तर कधी माझी विद्यार्थी कसे कुठे असतिल कोण घडलं कोण बिघडलं.. यावर चर्चा आणि राजकारणाचा पुसटसा न कळत विषय हाताळुन देशाचं भविष्य रंगवुन विशयाचा आणि वाढदिवसाचा शेवट गोड तिखट ने करताना अगदी प्रत्येक वर्षी प्रमाणे पेंशन लढा देणारे हे आदर्श शिक्षक म्हणजे आदरणीय फिरोज शेख यांचा वाढदिवस खुप थाटात साजरा झाला .

त्यावेळी मित्र धम्मदिप सवाई, योगेश चाळक सर , जगदिश चौधरी सर, आणि सतत आपल्या मित्राला आपल्या कलेतुन आनंदी ठेवणारे कलाशिक्षक आदरणीय अतुल गायकवाड सर जे माहितिचा अधिकार व पत्रकार संरक्षण समिती संघटक धाराशिव येथे कार्य करत आहेत. तरी सर्व संघटनेच्या सभासदांनी आदरणीय फिरोज सरांना वाढदिवसाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डिजिटल शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा केला .