✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.26 ऑगस्ट) :-दि,२५/८/२०२३ ला आदर्शगाव ग्रामस्तरीय समिती, ग्रामपंचायत व बारव्हा ग्रामस्थ यांचे वतीने श्री, मारोती वाघ व वडील संजयराव वाघ यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, अतिशय कठीण परिस्थिती आपले शिक्षण त्याने केले व त्यांची *BSF* बॉर्डर सेक्युरिटी फोर्स आसाम येथे निवड झाली.
त्या निमित्याने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना श्री. मारोती वाघ यांनी ह्या सत्काराचे खरे मानकरी आपले वडील श्री, संजय वाघ असल्याचे सांगितले मी मोलमजुरी व कॅटर्सचे कामं करुन शिक्षण, व रोज सकाळी व्यायाम करीत होते माझे स्वप्न होते की भारत मातेच्या सेवेत कामं करावं व त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली मी प्राथमिक शिक्षण गावातच घेतले गावाकऱ्यांनी मला वेळोवेळी मदत केली मी माझ्या गावाचा ऋणी आहे माझेकडून मी गावासाठी मी भविष्यात मदत करेल, माझं गावं आदर्शगाव योजनेत सहभागी झाले याचा मला अभिमान आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले याप्रसंगी विचार विकास संस्थेचे संचालक किशोर चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना असे म्हटले की, बारव्हा गावातील अनेक तरुण ही निर्व्यसनी आहेत,ही या गावाची मोठी दौलत आहेत.
मारोती सारखे अनेक तरुण या गावात निर्माण होतील अशी खात्री आहेत, गेली ५ महिन्यापासून गावांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत, गावातील महिला. पुरुष, ग्रामपंचायत सर्व सदस्य अतिशय मेहनत घेऊन आपलं गांव चांगलं होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, या प्रसंगी गोविंद ठोबरे, ग्रामसेवक यांनीही मारोती यांचे व गावाकऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले, तरुणच गावाला योग्य दिशा देऊ शकतो असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी सरपंचा जोत्सनाताई मेश्राम, उपसरपंच संध्याताई कारेकर, वैशाली ढोबळे सदस्या, कमलाकर निखाडे, सदस्य, बाळकृष्णजी वाघमारे, सदस्य, प्रणिता वाघ सदस्य, माधुरी वाघमारे ग्रामसंघ अध्यक्ष, पोलीस पाटील विद्या लढी, शुभम वाघमारे ग्रामकार्यकर्ता, कुणाल सुलभेवार सुषमा चाफले, प्रणय लढी, गावातील अन्य मान्यवर व ग्रामस्थ , युवक मंडळ उपस्थित होते.