आजची महिला ही अबला नसुन सबला नारी आहे : भास्कर ताजने

🔹भरगच्च महिलांच्या उपस्थितीत भद्रावतीत शिवसेना महिला स्नेहमिलन सोहळा संपन्न

🔸हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती औचित्य

✒️ मनोज कसारे (भद्रावती प्रतिनिधी)

भद्रावती (दि.23 जानेवारी) :-  महिला ही अबला नसून सबला नारी आहे. आज  प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. विगत काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते. संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही  शिवसेने तर्फे विविध उपक्रम राबवित आहोत.

महिलांनी एका विशिष्ट चौकटीत न राहता चौकटी बाहेर येऊन काम करावे महिलांच्या कार्यांना सशक्त करून महिलांनी सक्षम व्हावे. संक्रांतीच्या शुभेच्छा देत नारिशक्तीचा जागर व्हावा म्हणून अशा कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजने यांनी केले. ते २३ जानेवारी रोजी भद्रावती शहरातील श्री मंगल कार्यालय येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती व मकर संक्रांती निमित्त आयोजित भव्य हळदी कुंकू व स्नेह मिलन सोहळ्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात घेतलेल्या सदर कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर  शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष नर्मदा दत्ता बोरेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजने वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती नगर परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे ,भद्रावती नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सुनिता वराटकर, माजी नगरसेविका सुषमाताई शिंदे, महिला आघाडी शहर प्रमुख शिला आगलावे, सामाजिक कार्यकर्त्या, डॉ. प्रिया शिंदे, विद्या ठाकरे, प्रेमदास आस्वले, सरला मालोकार, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख माया नारळे, उपजिल्हा प्रमुख विद्या ठाकरे, पुष्पा मानकर, कीर्ती गोहने, ज्योत्स्ना कटाईत, कौशिक मॅडम, माधुरी फुकट, मालती ठेंगणे, उज्वला वानखेडे, स्नेहा बनसोडे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरला मालोकर, सूत्रसंचलन प्रतिभा मांडवकर यांनी केले तर आभार माया नारळे यांनी मानले.

*स्व.मोरेश्वरराव टेमुर्डे यांना वाहिली श्रद्धांजली*

वरोरा -भद्रावती विधानसभेचे माजी आमदार तथा महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांचे २२ जानेवारीला सकाळी निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदानाचे पण केला होता. त्यांची अंतिम इच्छा पूर्ती करीत त्यांच्या परिवाराने त्यांचा देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे सुपूर्द केला. साहेबांचे  कार्य सर्वांना प्रेरणादायी असून त्यांच्या जाण्याने मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरेकर यांनी व्यक्त करत सर्व महिलांनी श्रद्धांजली वाहिली.

*टेमुर्डे साहेबांचे अपूर्ण स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे – रवी शिंदे*

टेमुर्डे साहेब हे एक तत्ववादी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी तत्वाशी कधी तडजोड केली नाही. या मतदार संघात विविध विकासकामांचे स्वप्न त्यांनी बघितले होते. पण चुकीच्या माणसांच्या हाती मतदार संघाची धुरा गेल्याने मतदार संघात अनेक समस्या जैसे थे आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि साथीने साहेबांचे अपूर्ण स्वापण आपल्याला पूर्ण करायचे असल्याचे मत या कार्यक्रमानिमित्त त्यांनी आभासी पद्धतीने व्यक्त केले.