✒️ सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)
पुणे (दि.15 एप्रिल) :-
सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा गडचीरोली अंतर्गत जिल्हा परिषद शाळा गाढोदा येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते जळगाव येथील एडवोकेट प्रियंका साळवे मॅडम यांना आमंत्रित करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या ठीकाणी अंगनवाडी सेविका मा. त्रीवेणी बळीराम पाटील, वंदना ढेकू पाटील तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सोनवणे सर, अलोणे मॅडम जिल्हा परिषद शाळा गाढोदा येथील मुख्यध्यापक सपकाळे सर तसेच गाढोदा गावातील सरपंच मा. योगेश पाटील , स्वाती नन्नवरे भगवान सपकाळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून करण्यात आली.
प्रियंका साळवे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनाच्या कान्या कोपरऱ्यात पोहचवले आंबेडकर यांच्या जीवनातील छोटे छोटे कीस्से सांगीतले भाषण देणारऱ्या विद्यार्थ्यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्केच देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सांगता संविधान वाचनाने करण्यात आली. आभार संस्थेच्या उपाध्यक्षा गंगा सपकाळे यांनी मानले.