अहमदनगर जिल्हा पोलीस दलात मोठी खांदेपालट

🔹पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षकांचा समावेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधि)

पुणे(दि.14 ऑगस्ट) :- 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोलीस दलात सोमवारी रात्री उशिरा जिल्हा अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांची मोठी खांदेपालट करण्यात आली असून, याबाबत तसा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जाही केला आहे, यामध्ये १६ पोलीस निरीक्षक तर १२ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १० पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश अशा एकूण 38 अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत, नव्या बदल्यांमध्ये आर्थिंक गुन्हे शाखेला नवे पोलीस निरीक्षक मिळाले असून या शाखेचा पदभार नितीन चव्हाण यांच्याकडे सोपविला जाणार आहे.

तर सायबर पोलीस ठाण्यात मोरेश्वर पेनद्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांची बदली नगर नियंत्रण कक्षातून शेवगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, तसेच यामध्ये नगर जिल्हा पोलीस दलातील कोपरगांव शहर श्रीगोंदा घारगांव जामखेड कर्जत अकोले या सह अन्य पोलीस ठाण्यांना आता नवे कारभारी मिळाले आहेत.

सदर बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या पदस्थापने ठिकाणी ठिकाणी रुजू होऊन तसा अहवाल मुख्यालयाकडे सादर करण्याचे आदेश देखील जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केलेल्या बदल्या आदेशात नमूद केला आहे.