अवैध रेती तस्करीला वाली कोण … प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपुर(दि.15 जुलै) :- ग्रामीण भागातील दुर्गापूर, इरई नदीच्या पात्रातील खैरगाव चांदसुर्ला भटाळी, किटाळी परिसरातून रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या उत्खनन होत आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. तर मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर द्वारे रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुक केली जात आहे.

त्यामुळे स्थानिक रस्त्याची मोठ्या प्रमाणात दैनावस्था झाली आहे. तर सर्व माहिती असूनही संबंधित विभाग याकडे डोळेझाक करत आहे. रात्रीच्या सुमारास नदीपात्रातून जेसीबी ट्रॅक्टरमधून रेती भरून ठराविक ठिकाणी साठवली जाते. त्यानंतर साठवणुकीतून जादा दराने रेती विकली जात आहे.

एकीकडे इराई नदीतून होत असलेल्या अवैध रेती चोरीमुळे शासनाचा महसूल बुडत आहे, तर दुसरीकडे उत्खननामुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. त्याला ही या अवैध रेती चोरी तुन आर्थिक लाभ होत असल्याचे या सर्व प्रकारातून दिसून येत आहे तरी सूद्या या कड़े महसूल प्रशासन गप्प का असा सवाल आता या परिसरातील नागरिकाना पडू लागला आहे.