अविनाश बारगळ यांनी बीड पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला, मावळते पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बीड जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतीनिधी)

पुणे (दि.10 ऑगस्ट) :- 

बीड जिल्ह्याचे आदरणीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक पदभार घेतल्यापासून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले .

पोलीस अधीक्षकांची बदली झाली असली तरी अद्याप त्यांच्या नियुक्ती पदस्थापना देण्यात आली नाही, आज बीड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी घेतला पदभार आहे, अविनाश बारगळ हे एक चांगला अधिकारी आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यातही ते तेवढ्याच ताकतीने काम करून जिल्ह्यातील नागरिकांची सेवा करतील असा विश्वास सध्या बीडकरांमधून निर्माण होत आहे.