🔸पोलिसांचे जनतेतून विशेष कौतुकांची थाप
✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)
पुणे(दि.27 ऑगस्ट) :- राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अल्पवयीन मुलीस कशाचे तरी आम्ही दाखवून पळून घेवुन जाणाऱ्या आरोपींस राहुरी पोलिसांनी अवघ्या 48 तासांत पकडून मुलीला पालकांच्या स्वाधीन केले आहे, या अपहरित मुलीस आरोपीने प्रथम नाशिक नंतर सुरत व तेथून धुळ्याकडे नेले, परंतु पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत मुलीची धुळ्यातून सुटका केली आहे.
अल्पवयीन मुलीस राहत्या घरांतून कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात करणाकरिता कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले होते, याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता, कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती घेवुन याबाबत इसम नामे सचिन भाऊसाहेब विटनोर रा. मानोरी ता.राहुरी जिल्हा अहमदनगर) यांनी सदर अल्पवयीन मुलीस सुरत राज्य गुजरात येथे अपहरण करून नेले होते.
सदर इसम हा मुलीस घेवुन धुळ्यात येत असल्याची माहिती पोलिसांना लागली होती, त्या अनुषंगाने राहुरी पोलीस स्टेशनच्या तपासी पथकांने धुळे बस स्थानकात पहाटेच्या सुमारांस आरोपींसह मुलीस ताब्यांत घेतले, अल्पवयीन मुलीची सुटका करून तिच्या पालकांच्या ताब्यांत देवुन आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कुलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय आर. ठेंगे स.पो.नि. परदेशी पो.उनि. चारुदत्त खोंडे पो.कॉ. सुरज गायकवाड पो. हवा.राहुल यादव पो.ना. प्रवीण बागल पो. कॉ. प्रमोद ढाकणे पो. कॉ. सतीश कहाडे पो.कॉ. नदीम शेख पो.कॉ.सचिन बामणे पो. कॉ. गोवर्धन कदम पो. कॉ. अंकुश भोसले पो. कॉ.संतोष राठोड आदीं पोलिसांनी या कारवाईस सहभाग घेतला पुढील तपास स.पो.नि.परदेशी करीत आहेत.