✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.25 ऑगस्ट) :- तालुक्यातील छोटेसे गाव आसाळा या गावातील अल्पभूधारक शेतकरी श्री अजाबराव बापूराव मगरे , हे आपल्या पाच एकर शेती वर, आपल्या आई वडील यांना पालन पोषण करीत असतांना त्यांनी आपल्या दोन मुली आणी एक मुलगा यांचे शिक्षण मोठ्या काटकसरीतून केले.
मुलाला आपली परिस्थिती माहीत असताना त्यांने आपले शिक्षण गावातूनच सुरुवात केली गावात 1ते 4 पर्यंत जि.प शाळा, आसाळा ,5 ते 10 पर्यंत चे शिक्षण संत तुकडोजी विद्यालय टेमुर्डा,11 व 12 वी आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे संगणक शास्त्रात अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांची महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा संवर्गातील संगणक अभियंता या पदावर julai-2013 मध्ये निवड होवून फैजपूर नगरपरिषद जि .जळगाव येथे पदस्थापना मिळाली.त्यानंतर जून 2017 ला सावदा नगरपरिषद जी जळगाव येथे प्रशासकीय बदली झाली नंतर डिसेंबर -2018 मध्ये गडचांदूर नगरपरिषद येथे बदली झाली.
नगरपरिषद मध्ये संगणक अभियंता नोकरीं करीत असतांना विभागीय परीक्षा देत होते त्यांनी सन 2021मध्ये विभागीय परीक्षा दिली आणि गुणवत्ता च्या आधारावर निवड होवून आज महाराष्ट्रामध्ये 44 जागा असताना 43 व्या नंबर वर त्यांना मुख्याधिकारी,नगरपंचायत जाफराबाद येथे पदस्थापना मिळाली .