✒️सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)
बुलढाणा(दि.26 सप्टेंबर) :-
अनेक हिंदी, मराठी,तेलगु चित्रपटा मध्ये अभिनय करनारे आपल्या अमरावती चे विनय भगत यांचा *”THE STORY OF YUVRAJ AND SHAHAJAN”* हा लघुपट अमेरीका मधिल 19 व्या तस्वीर या फिल्म महोत्सवात 2024 साठी निवडला गेला आहे, या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक संतोष राम सर आहे, त्यांनी या मध्ये खेड़ेगावातील कथा मंडलेली आहे.
दक्षिण आशियाई चित्रपटासाठी ऑस्कर ची पात्रता असलेला लघुपट चित्रपट महोत्सव म्हणून तस्वीर महोत्सव ओळखला जातो, यंदा 15 ते 20 अक्टूबर या काळात होणार असुन या महोत्सवा मध्ये 110 चित्रपट दखावण्यात येणार आहेत, यांमध्ये बांग्लादेश, कैनेडा, फ्रांस, श्रीलंका, अमेरिका, भारत, पाकिस्तान, जर्मनी, स्विजरलैंड, नेपाल, यूनेटेड किंगडम, डेनमार्ग, नायजेरिया , पोर्तृगाल आणि स्वीडन आशा 15 देशमाधुन चित्रपट आलेले आहे, उद्गीर मध्ये याचे चित्रीकरण झालेले आहे. यामधील कलाकार :
विनय भगत, राहुल बिरादर, विवेक होलसंब्रे, अंजली जाधव, राजकुमार मुंडे, राम सरनेव, इत्यादिंचा समावेश आहे. या सिनेमाचे व सर्व कलाकारांनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.तसेच आपल्या विदर्भातील अमरावती चे विनय भगत यांची उतुंग भरारी अमेरिकेमध्ये होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारापर्यंत पोहचली त्यांनी असेच मोठमोठे कार्य करावे.. त्यासाठी त्यांना सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पत्रकार सारंग महाजन यांनी लहान बंधू विनय भगत यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.