अपघातात 4 महिलांचा मृत्यू तर 13 जण गंभीर जखमी 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.10 फेब्रुवारी) :- ब्रम्हपुरी शहराजवळील मौजा माहेर येथील 17 महिला उमरेड तालुक्यातील पिंपरी येथ चना कापणीच्या काम आटोपून दिनाक 8 ला सायंकाळी 7 च्या दरम्यान सुमो या वाहनाने परत येत असताना त्यांच्या वाहनाला अपघात होऊन त्या मध्ये तीन महीलाचा घटनास्थळी तर एका महिलेचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 13 महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.आज दिनाक 9 ला माहेर गावातील स्मशानभूमीत संपूर्ण गावकऱ्यांच्या व नातेवाईकांच्या उपस्थितीत मृत महिलांवर शोकाकुल वातावरणात अंतीमसंस्कर करण्यात आले.

             प्राप्त माहिती नुसार मोजा माहेर येथील काही महिला चना कापनिकरता दुसऱ्या जिल्ह्यात जात होत्या .मागील काही दिवसा प्रमाणे दिनाक 8 फेब्रुवारी ला 17 महिला सुमो MH 33A1947 या नंबरच्या वाहनात बसून पिंपरी या गावी चना कापणीला गेल्या होत्या.तेथील काम आटोपून सायंकाळी 7.30 वाजता परत येत असताना बेला पोलीस ठाणे हद्दीतील उमरेड गिरड मार्गावरील दंदे सालेभट्टी गावा जवळील खातगाव वडणावर सुमो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन पलटी होऊन गंभीर अपघात झाला. अपघात एवढा मोठा होता की घटनास्थळी रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन , रसिका बागडे या महिलांचा मृत्यू झाला तर सोनाबाई सिद्धूके या महिलेचा नागपूर उपचारादरम्यान मृत्यू झाला.तनवी विनोद मेश्राम, दुर्गा विजय आडकिने,संगीता देविदास आडकिने ,विना विक्रांत अडकिने, ,संध्या संतोष बागडे, सरिता विजय नागापुरे 

,मनोरथा शांताराम मेश्राम, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम ,जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अरविंद बागडे या महिला सह सुमोचा वाहन चालक शंकर प्रभाकर मसराम वय 30 राहणार जांभुळघाट हा गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम उमरेड तालुक्यातील शीर्शी प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर नागपूर येथे हलविण्यात आले असून तिथे उपचार सुरू आहे.

       जेमतेम 275 ते 300 घराचे माहेर गावात 800 लोकसंख्या असून 605 महिला पुरुष मतदार आहेत.झालेल्या अपघातात एवढ्या छोट्याश्या गावातील चार महिलेचा मृत्यू तर 13 महिला गंभीर जखमी झाल्याने संपूर्ण गाव आज शांत दिसत होते. माहिती मिळाल्यापासून गावात कुणाच्याही घरी चूल पेटली नाही.माहिती मिळाल्यापासून मृतकाचे व जखमींचे नातेवाईक गावामध्ये पोहचत होते.आज सकाळ पासून गावातील प्रत्येक घरासमोर, रस्त्यावर लोक उभी दिसत होती.          

        माहेर गावाचे सरपंच नितेश राऊत काल पासून काही सहकर्यासोबत नागपूरला जाऊन जखमी सोबत होते. आज दिनाक 9 ला माहेरचे सरपंच नितेश राऊत नागपूर वरून उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एक महिला व उमरेड येथून तीन महिलांचे शव तीन रुग्णवाहिकेतून दुपारी 2 च्या सुमारास माहेर येथे घेऊन आले.गावात अपघातातील मृत चारही महिलांचे शव येताच रडण्याचा आवाजाने गाव हादरून गेले होते.दुपारी 3 च्या दरम्यान चारही मृतांची एकत्र शवयात्रा काढण्यात आली आणि गावातील स्मशानभूमीत दफन करून अंतीमसंस्कर करण्यात आले.या वेळी संपूर्ण आजू बाजूच्या गावातील लोकांसह मृतकाचे व जखमींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.