🔹टोकणपद्धती आणि आधुनिक यंत्रांचा वापर करा(Use cutting methods and modern machinery
✒️मनोहर खिरटकर खांबडा(khambada प्रतिनिधी)
खांबडा (दि.26 जून) :- दरवर्षी परंपरागत पद्धतीने पेरणी करणारे शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही. उलट खर्च वाढत आहे. यावर मात करण्यासाठी नवीन तंत्राचा वापर केला पाहिजे तरच शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे, असे टेमुर्डा कृषी मंडलचे कृषी सहायक चवरे यांनी खाबांडा येथे शेतीशालेत मार्गदर्शन करताना सांगितले.
चवरे म्हणाले, बहुतांशी शेतकरी पारंपरिक पद्धतीने बियाणांची पेरणी करतात. यामध्ये बियाणे जास्त लागते आणि उत्पन्न कमी होते. त्यातच अधिक बरसणारा पाऊस संपूर्ण शेत शिवाराचे गणित बिघडवून टाकत आहेत यावर मात करण्यासाठी कृषी विभागाने आधुनिक यंत्र पद्धतीचा अवलंब करण्याचे सूचनाही केले आहेत.
याशिवाय टोकण पद्धत व बिबिएफ पद्धतिचा वापर करून बियाणे लावले तर एकरी बियाणांच्या खर्चही कमी होईल. सोबतच उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. त्यासाठीच कृषि विभागामार्फत आम्हि गावपातळीवर शेतीशाळा घेतल्या जाते.
शेतकऱ्यांनी सोयाबीनचे उत्पन्न वाढविण्यासाठीच नव्हे, तर कपाशी,तुर या पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला तर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल. शिवाय अधिक पाऊस आला किंवा कमी पाऊस झाला तर वरंबा पद्धतीने साचलेले पाणी किंवा निचरा झालेले पाणी पिकाला फायदा देणारे ठरणार आहे.
यामुळे पिकांचे संरक्षण होईल. सोबतच उत्पन्नही वाढण्यास मदत होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कृषी विभागामार्फत वारंवार मार्गदर्शन केले जात आहे. यावेली खाबांडा येथील अनेक शेतकरी उपस्थित होते