✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू(दि.7 सप्टेंबर) :-
स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव बू येथे नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली यामध्ये अनेक विषयासह महात्मा गांधी गाव तंटामुक्त समिती च्या अध्यक्षपदाची निवड करायची होती यात अनेकांनी आपले सहकार्य दर्शवले परंतु नागरिकांच्या व गावकऱ्यांच्या मतानुसार जुन्याचं अध्यक्षाला पदभार द्यावा असा आग्रह धरला व गावकऱ्यांच्या बहुमत कायद्यानुसार श्री आतिश राजू भलमे यांची दुसऱ्यांदा महात्मा गांधी गाव तंटामुक्त समिती च्या अध्यक्षपदी निवड सर्वानुमते करण्यात आली सदर ही निवड सभेचे अध्यक्ष येथील सरपंच श्री योगीराज वायदुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपसरपंच कुमारी संगीता मंगाम, सदस्य गण श्री रामकृष्ण डाहुंले , शालू ताई भलमे, विद्या ताई तुरानकर , अजय बगडे, ग्राम सेवक लांडे साहेब इत्यादी हजर होते. आतिश भलमे यांची दुसऱ्यांदा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय गाठले , चेतन टोंगे , महेश शास्त्रकार, गोपाल भलमे , प्रतीक भलमे रोजगार सेवक,सौ शिला घानोडे, सौ अनिता टोंगे इत्यादींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.