✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.25 जुलै) :-
भद्रावती तालुक्यात दिनांक 19/07/2024 ते 23/07/2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी मुळे विविध समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या बाबीची दखल घेऊ.
ग्रामपंचायत सरपंच संघटनेनं मा. तहसीलदार तसेच मा. गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधून घेतले. तालुका सरपंच ग्राम संवाद संघटनेचे अध्यक्ष श्री. नयन बाबाराव जांभूले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघटनेच्या पदाधिकारी श्री. मंगेश भोयर सरपंच नंदोरी, श्री. शंकर रासेकर सरपंच सागरा, श्री. बंडू पाटील ननावरे सरपंच मुधोली, श्री राजू डांगे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तथा उपसरपंच बरांज, श्री. अनिल खडके सरपंच घोडपेठ, श्री. एकनाथ घागी सरपंच पावणा, श्री. मंगेश नन्नवरे सरपंच सावरी, श्री. रवींद्र देठे सरपंच देऊरवाडा, श्री. महेश मोरे सरपंच कोंधा, श्री. विजय खांगार सरपंच चालाबरडी श्री. विलास लेडांगे सरपंच चापराला यांच्या उपस्थितीत खालील बाबींचे निवेदन देण्यात आले.
1. अतिवृष्टी मुळे शेत पिकांचे नुकसान झालेले आहे त्यांचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई मिळण्यात यावी
2. अतिवृष्टी मुळे गावातील तसेच गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे नुकसान झालेले आहे त्याची मौका चौकशी करण्यात यावी व दुरुस्ती करण्यात यावी.
3. गावाला जोडणारे रस्त्यावरील पुल वाहून गेले आहे तसेच काही पुलाचे कटघरे वाहून गेले आहे त्याची दुरुस्ती करण्यात यावी
4. अतिवृष्टी मुळे गावातील घरे पडले आहे त्यांची चौकशी करण्यात यावी व नुकसान भरपाई देण्यात यावी
5. तसेच महत्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषद शाळा यांच्या रिक्त जागेवर शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी याचे निवेदन देण्यात आले.