अतिप्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प अंतर्गत खेमजई येथे ओ.डी.के. सर्वे सपन्न

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.9 ऑगस्ट) :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, एक्सिस बँक फॉउंडेशन,भारत रुलर लाईलिहूड फाऊंडेशन व कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या परस्पर सहकार्याने वरोरा तालुक्यातील एकूण 25 ग्रामपंचायत मध्ये अति प्रभावीत मेगा पाणलोट प्रकल्प राबवण्यात येत आहे,त्यानुषगाने दिनांक 8/8/2024 ला ग्रामपंचायत खेमजई येथे शिवार फेरी करून माथा ते पायथा उपचार घेण्यात आले.

जि.आय.एस.आधारित सविस्तर प्रकल्प आराखडा पाणलोट एकूण भौगोलिक क्षेत्र निश्चित केले असून सध्या निवळ केलेल्याला पाणलोट क्षेत्र मध्ये जि.आय.एस.आधारित सविस्तर कृति आराखडा तयार करण्या करिता शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकरी निवळ, पाणलोट उपचार,शेततळे,बोडी, विविध योजना बाबत माहिती देऊन ते लाभार्थी पर्यन्त पोहचवणे या आधारे पाणलोटाची कामे निवळ करून ती त्या स्तरावर राबवणे या प्रकल्प अंतर्गत माथा ते पायथा जलसंधरनाची कामे करून पाण्याचा स्तर वाढण्यात येणार आहे त्याच बरोबर मनरेगा अंतर्गत कामना गती देऊन सीमांत कुटूंब यांचे उत्पन्न वाढ करण्याच्या दृष्टीने व पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न होणार आहेत व उपजीविका यावर भर देण्यात येत आहे.

पर्यावरणासी आपल्याला कसे जुळून राहता येईल याचे एक सुंदर उदाहरण खेमजाई या गावाने दिला आहे, एक आदर्श गांव म्हणून खेमजई चि ओळख निर्माण झाली आहे, लोकसहभागातून सीताफळ चे क्लस्टर तयार करून रोजगार चा एक नवीन पर्याय उपलब्ध केला आहे व एक नवीन आदर्श निर्माण केला आहे याचाच एक भाग म्हणून सहभागी ग्रामीण मूल्यकण करून त्या गावचा कृति आराखडा बनवून तो राबवण्यात येणार आहे.

या शिवार फेरी करिता गावातील सरपंच ग्रामस्थ,ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य रमेश चौधरी,ग्रामरोजगार सेवक रविंद्र रणदिवे, विनायक बावणे, अशोक कापटे, विनोद कीर्तने उपस्थित होते.त्याच बरोबर कृषी विकास संस्था चे समन्वयक कुंदन राणे ,टीम लीडर रोशन मानकर,कृषी तज्ञ प्रबुद्ध डोये,तालूका समन्वयक दिक्षानंद राऊत,वाडी प्रकल्प व्यवस्थापक संतोष गुजर, साधन व्यक्ती गुरूदास चौधरी उपस्थित होते.