अतिप्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प अंतर्गत सहभागी ग्रामीण मूल्यांकन सपन्न

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.23 जुलै) :- वरोरा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील 25 ग्रामपंचायत मध्ये भारत रुलर लाईलिहूड फाऊंडेशन व कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने अति प्रभावीत मेगा पाणलोट प्रकल्प राबवण्यात येत आहे,त्यानुषगाने दिनांक 22/7/2024 ला ग्रामपंचायत वायगाव भोयर, सालोरी व दिंडोळा येथे सहभागी ग्रामीण मूल्यांकन घेण्यात आले.

जि. आय. एस.आधारित सविस्तर प्रकल्प आराखडा पाणलोट एकूण भौगोलिक क्षेत्र निश्चित केले असून सध्या निवळ केलेल्याला पाणलोट क्षेत्र मध्ये जि. आय. एस. आधारित सविस्तर कृति आराखडा तयार करण्या करिता सहभागी ग्रामीण मूल्यांकन च्या माध्यमातून शिवार फेरी करणे, शेतकरी निवळ करणे, विविध योजना बाबत माहिती देऊन ते लाभार्थी पर्यन्त पोहचवणे या आधारे पाणलोटाची कामे निवळ करून ती त्या स्तरावर राबवणे या प्रकल्प अंतर्गत माथा ते पायथा जलसंधरनाची कामे करून पाण्याचा स्तर वाढण्यात येणार आहे त्याच बरोबर मनरेगा अंतर्गत कामना गती देऊन सीमांत कुटूंब यांचे उत्पन्न वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत व उपजीविका यावर भर देण्यात येत आहे,पर्यावरणासी आपल्याला कसे जुळून राहता येईल व याचाच एक भाग म्हणून सहभागी ग्रामीण मूल्यकण करून त्या गावचा कृति आराखडा बनवून तो राबवण्यात येणार आहे.

या करिता सर्व गावातील सरपंच ग्रामस्थ,ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य,महिला बचत गट व ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.त्याच बरोबर कृषी विकास संस्था चे टीम लीडर रोशन मानकर,कृषी तज्ञ प्रबुद्ध डोये तालूका समन्वयक दिक्षानंद राऊत, निकलेश चौधरी साधन व्यक्ती मंगेश तुमसरे,विशाल आडे,गुरूदास चौधरी,आचल घोडमारे,पल्लवी नन्नावरे,नीलिमा वनकर,माया पोहीणकर उपस्थित होते.