अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.10 ऑगस्ट) :- स्थानिक शेगाव बूज पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या बोथली खानगाव या मार्गावर एका अज्ञात वाहनाने बेधडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर असे की मृतक रामचंद्र मोतीराम भरडे राह. बोथली वय ७० वर्ष हा रोजच्या प्रमाणे गुरे ढोरे चारण्यास जात असता वरोरा चिमूर या महामार्गावरील बोथली ते खानगाव या मार्गावर एका अज्ञात चार चाकी वाहने बे धडक ठोस मारून पसार झाला व यात मृतक रामचंद्र भरडे वय ७० वर्ष याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असता याची माहिती पोलीस स्टेशन शेगाव बूज येथील ठाणेदार श्री योगेंदरसिंग यादव यांना मिळताच घटना स्थळी त्यांचे पोलीस अधिकारी दाखल झाले .

पंचनामा करण्यास सुरुवात केली यात रामचंद्र याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजले व अज्ञात वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली असल्याचे समजले.