🔸हजारोंचा रुपयाची चोरी सह साहित्य लंपास
🔹चारगाव बूज येथील बस स्टॉप वरील घटना
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.25 जानेवारी) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव बूज येथे काल दि.25 तारखेच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी बस स्थानक येथे असलेले हॉटेल तसेच पान टपरी फोडून मुद्देमालासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सदर यात माऊली पान सेंटर चे मालक अनिल विठ्ठल भलमे यांच्या पान टपरी मधून पान मटेरियल साहित्य तीन हजार रुपये व रोख रक्कम दोन हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला यात त्यांचे पाच हजार रुपये चे आर्थिक नुकसान झाले आहे. याचं सोबत त्यांच्या दुकानाला लागून असलेले हॉटेल यामधून हॉटेल चे साहित्य तसेच दोन भारत गॅस चे भरलेले सिलेंडर चोरून नेले यात हॉटेल मालक पितांबर आडकिने यांचे आठ हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या सोबत बस स्टॉप वर असलेले इतर दुकाने देखील अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश मिळाले नाही सदर ही घटना आज सकाळी उघडकीस आली याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन शेगाव बूज. येथे दिली असता येथील ठाणेदार श्री योगेंदरसिंग यादव यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहे.