अग्नि रक्षक व वन कामगार यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

🔸माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी घेतली या प्रकरणाची दखल

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.24 जानेवारी) :- अग्नि रक्षक व वनकामगार यांच्या समस्या सोडवण्याबाबत शेरखान पठाण चंद्रपूर प्रहार जिल्हाप्रमुख व अध्यक्ष अग्नीरक्षक वनमजूर बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांनी प्रत्यक्ष नामदार माजी राज्यमंत्री यांनी आपल्या पत्रांद्वारे समस्या सोडवण्याची पत्र सादर केले होते या पत्राची दखल घेत बच्चू भाऊ कडू यांनी माननीय श्री गणेशजी नाईक वनमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई. तसेच माननीय संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांना पत्राद्वारे कळवून यांच्या समस्या तात्काळ निकाली लावण्यात याव्या कविता पत्रांद्वारे कळविण्यात आले आहे. 

           गाव खेड्यातील तसेच जंगल लगत असलेल्या खेड्यातील वृद्ध मजूर तसेच तरुण मजूर हे गेल्या अनेक दिवसापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये अग्नीरक्षक म्हणून तसेच वनमजूर म्हणून काम करीत आहेत परंतु यांच्यावर गेल्या अनेक दिवसापासून अन्याय होत असल्याने हा अन्याय दूर करण्यात यावा याकरिता आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली मा श्री .जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सविस्तर असे की. अग्नि रक्षकांना वन विभागाकडून वेळेवर मजुरी मिळत नाही यासोबत त्यांना पाच महिन्याकरिता फक्त कामावर ठेवले जातात तेव्हा त्यांना बाराही महिने कामावर सतत ठेवण्यात यावे, तसेच अग्नीरक्षकांना त्यांच्या संरक्षण करिता बॅग थर्मास टॉर्च जूते अग्नीरक्षकाचा ड्रेस हेल्मेट अग्नीरक्षक ओळखपत्र इत्यादी साहित्य त्यांना देण्यात यावे, अग्नि रक्षकांना फक्त त्यांना अग्नी वीजवण्याचेच काम देण्यात यावे. इतर कोणतीही काम देऊ नये. तसेच काही वन कर्मचारी यांचा फायदा घेत यांच्या कामाच्या पावत्या बनवून बिल् व मस्टर भरून वेळोवेळी यांची रक्कम हडप करतात.

 तसेच अग्नि रक्षकांना निधी भत्ता देण्यात यावा अग्नीरक्षकाची ड्युटी ही आठ तासाची करण्यात यावी तसेच यांचा मासिक पगार 12500 ऐवजी 18500 करण्यात यावा व त्यांच्या खात्यामध्ये दर महा मासिक रूपात देण्यात यावा. तसेच अग्नी विजवताना काही जीवित हानी होऊ शकते करिता शासनाकडून वन विभागाकडून त्यांचा पन्नास लाखाचा विमा उतरविण्यात यावा अशा अनेक मागण्याच्या समस्या सोडवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले. समस्या तात्काळ निकाली लागणार असल्याने अग्नि रक्षक तसेच वन मजूर यांच्या चेहऱ्यावर आनंद हास्य उमटले असल्याचे पाहायला मिळाले.