अखेर विध्यार्थ्यांच्या उपोषणाची घेतली दखल

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.6 सप्टेंबर) :- मोरवा येथील जी. प. शाळेतील विथ्यार्थी संवर्ग 1मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना आमच्या शाळेत नियुक्त करू नका आणि लगदच्या चारगावं शाळेतील वर्ग 5वा वर्ग शिक्षकांसाह आमच्या मोरवा शाळेला संलग्न करून कायमचे समायोजन करा या मागणीसाठी 5सप्टेंबर शिक्षकदिनी मोरवा येथील हनुमान चौकात उपोषणास बसले होते.

दि. 5मार्च 24 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. प. चंद्रपूर यांनी मोरवा शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन सारख्या घटत असलेल्या पटसंख्या वर उपाय योजना म्हणून चर्चे दरम्यान आपण ही शाळा दत्तक घेत आहोत खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे शासकीय शाळेत सुद्धा गुणवंत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून आधुनिक भौतिक सुविधा, प्रशस्त वास्तू,क्रिडांगण, बाग बगीचा, आणि नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र दिलेल्या आश्वासनच विसर पडल्याने ऑगस्ट महिन्यात एकावर एक तीन शिक्षकांच्या गरज नसताना नियुक्त्या केल्या आणि संवर्ग 1मध्ये मोडणारे दोन्ही डोळ्यांनी अंध शिक्षक यावेळी पाठवले याचा निषेध म्हणून शिक्षकदिनी विदयार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकून गावातील मुख्य चौकात उपोषणस बसून प्रशासनाचे लक्ष वेधले.

          ह्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन संवर्ग विकास अधिकारी शासकीय आदेश घेऊन विध्यार्थ्यांच्या भेटीला आले प्रशासकीय कामाला थोडा वेळ लागतो पण आपली मागणी रास्त आहे शाळा समयोजनाच्या प्रस्तावाच्या प्रक्रियेला पं. स. कडून मंजुरी करिता जी. प. कडे हा प्रस्तावं पाठवावा लागतो तो प्रस्ताव आताच ताबडतोब पाठवतो आणि प्रशासकीय स्तरावरून योग्य सहकार्य करतो सोबतच त्या अंध शिक्षकाची तात्काळ बदली केल्याचा आदेश काढतो आणि वारंवार अशा चुका होणार नाही याची काळजी घेतो असे आश्वासन देऊन त्यांनी विद्यर्थ्यांचे उपोषण सोडवले.

          ह्या उपोषणा नर्सरी, आणि वर्ग पहिला ते सातवा पर्यंत सर्व विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला आमच्या मागणीला गांभीर्याने घेतलं नाही तर आज जसा शुकशूकाट शाळेत आहे तसा आमच्या टी. सी. आम्ही काढून ह्या शाळेला कायमचे कुलूप लावून शिक्षकाचे पुनर्वसन केंद्र म्हणून खुशाल चालवा असा गरभीत इशारा देऊन मुलांनी उपोषण सोडले.