🔹राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अथक परिश्रमाला अखेर यश मिळाले
✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी)
चिमूर(दि.18 ऑगस्ट) :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ सतत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजाच्या अनेक प्रलंबित समस्या, न्याय मागण्याकरिता, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात ओबीसी महासंघाच्या शाखेच्या माध्यमांतून अखंडपणे ओबीसी समाजासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, व राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांचे निस्वार्थ नेतृत्वात कार्य सुरु आहे.
राष्ट्रीय महासंघाने देशभरातील ओबीसी समाजात जनजागृती करून एकत्र करण्याचे फार मोठे काम केले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूर, दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, अमृतसर, दोन वर्ष कोविड काळात सुध्दा ऑनलाईन बेबिनार ,अधिवेशने घेतली यात देशभरातून पाच कोटी लोकांनी सहभाग दर्शविला होता.या महासंघाचे अधिवेशनाचे माध्यमातून ओबीसी समाजाच्या समस्या, 1 जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, 2 ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, मुलांसाठी वसतिगृह मिळाली पाहिजे 3 केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापना झाले पाहिजे,4 क्रिमिलियर मर्यादा वाढविणे,5 ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे,6 आरक्षणाची 50% अट रद्द करावी, विध्यार्थी शिष्यवृती, अशा अनेक मागण्याचे ठराव घेऊन, आता पावेतो संपन्न झालेल्या 9 महाअधिवेशनाचे माध्यमातून अधिवेशनात उपस्थित, असणाऱ्या,आयोगाचे अध्यक्ष,केंद्रीय मंत्री महोदय, राज्यांतील मंत्री महोदय, खासदार, आमदार यांना महासंघाने निवेदने दिलीत मंत्री महोदयांनी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या देश भरातून आलेल्या ओबीसी बंधावसमोर आम्ही सर्व ताकदीनी ओबीसी समाजाच्या समस्या सोडवून न्याय मिळवून देऊ, व ओबीसी समाजाच्या पाठीची राहु असे आश्वासन दिले, या बरोबरच महासंघाने रस्त्यावर उतरून अनेक आंदोलनाचे केली.
सन 2016 हिवाळी अधिवेशनात विधानभवन नागपूर येथे एक लाखाचे वर विशाल मोर्चा काढला, राष्ट्रीय युवक महासंघाचे माध्यमातून युवकांना एकत्र करून त्यांना समस्येची जान व्हावी, व विद्यार्थी जागृत व्हावा या करिता सन 2017 ला नागपूर येथे युवक युवतीचे भव्य महाआधिवेशन घेण्यात आले, सन 2018 ला वरील अनेक समस्या घेऊन जंतर मंतर दिल्ली येथे धरणे देण्यात आले, सन 2020 ला नागपूर येते आंदोलनामध्ये सरपंच यांचा सहभाग असावा म्हणुन नागपूर येथे सरपंच महामेळावा घेण्यात आला, सन 2020 मुंबई येथे ओबीसी गोलमेज परिषद घेण्यास आली. सन 2020 ला नागपुर हिवाळी अधिवेशनात विशाल ओबीसी मोर्चा काढन्यात आला.
सन 2021 महाराष्ट्रातील खासदार, आमदार यांचे घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.राष्ट्रीय ओबीसी महासंघ एकसूत्रता येन्याकरिता एकच जिल्ह्यात आंदोनल न करता संपूर्ण राज्यभर व देशात आंदोलन, मोर्चे, निवेदने देणे, हे ओबीसी समाजाचे कार्य सतत वर्षभरच सुरु असते हे विशेष.सन 2020 ला चंद्रपूर जिल्ह्यात सतत 15 दिवस मा सचिन राजूरकर महासचिव यांचे नेतृत्वात व अनेक ओबीसी बांधवांचे सहकार्याने, ग्रामीण भागातील ओबीसी बांधवांत जनजागृती करण्याकरिता 15 ही तालुक्यात ओबीसी अस्मिता रथ यात्रा काढून गावागावात सभा घेऊन ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत, व ओबीसीच्या अनेक समस्यांबाबत मार्गदर्शन,जनजागृती करण्यात आली, महाराष्ट्र शासन विध्यार्थी वस्तीगृहा बद्दल वारंवार तारखा देऊन आस्वासने देत आहे.
शासनाला जाग यावी लेखी आश्वासन मिळावे, करीता ओबीसी महासंघाने संपूर्ण राज्यभर सन 20023 पासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्यात चंद्रपूर जिल्हाधिकारी कर्यालया समोर दिनांक 11/9/2023 पासून ते 30/9/2023 पर्यंत 21 दिवस अन्नत्याग आंदोलनाला प्राणाची बाजी लावून, कशाचीही पर्वा न करता,ओबीसी शुर योद्धा रविंद्र टोंगे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी विध्यार्थी महासंघ चंद्रपूर हे बसले होते, त्यांची तब्येत चिंताजनक होताच प्रशासनाचे बळजबरीने त्यांना दवाखान्यात भरती केले, त्यानंतर विजय बलकी, प्रेमानंद जोगी हे उपोषणाचा बसले सदर उपोषनाची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर उपोषण पेंडालला भेट देऊन उपोषण कर्त्याशी चर्चा केली,निवेदनातील समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी लेखी आश्वासन दिले की आम्ही सर्वोतरी प्रयत्न करून, संपूर्ण राज्यभर ओबीसी मुलामुलींसाठी वसतिगृह सुरू करु,, अशा आश्वासना नंतर एकूण 21 दिवस चाललेले उपोषण मागे घेण्यात आले, सोबत पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, सचिन राजूरकर महासचिव व शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते.
या आंदोलन कालावधीत सर्व जिल्हयातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसीय धारणा आंदोलन, चंद्रपुरात मुंडण आंदोलन, शासन जी. आर होळी आंदोलन, तिरडी आंदोलन, रास्ता रोको आंदोलन, मुंडण आंदोलन असे अनेक प्रकारचे आंदोलन करण्यात आले, त्यानंतरच चिमूर तालुक्यांत दिनांक 7/12/2023 ते 13/12/2023 पर्यंत एकूण 7 दिवस ओबीसी महासंघाचे वतीने चिमूर तहसील कार्यालयासमोर अन्नत्यान आंदोलनाला श्री बाळकृष्ण लांजेवार, व अजित सुकारे बसले होते, या आंदोलनाची सुध्दा दखल घेऊन सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते, परंतु वसतिगृहाचे कार्यवाहीला शासनाकडून होत असलेला विलंब लक्षात घेऊन वारंवार स्मरणपत्र, निवेदन देऊन मंत्री महोदयाच्या भेटी घेण्यात आल्या, विशेष दिनांक 7/8/2024 ला पंजाब अमृतसर महाधिवेशनात उपस्थित राहण्याकरिता बरेचं दिवस अधिवेशनापूर्वी
ओबीसी आयोग अध्यक्ष,मंत्र्यांना, खासदार , आमदार यांना निमंत्रण देण्याकरीता भेटी घेण्यात आल्या त्या वेळी अनेक समस्यांवर व प्रामुख्याने विध्यार्थी वसतिगृहाबाबत चर्चा करण्यात आली, आत्ता पावेतो महासंघाचे वतीने ओबीसी समाजाच्या हिताचे 48 जी.आर.शासनाकडून काढून घेऊन ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिला.याही अधिवेशनात 52 ठराव घेण्यात आले असून त्याच्या प्रति उपस्थित ओबीसी आयोग अध्यक्ष,मंत्री, खासदार, आमदार यांना देण्यात आल्या, घेतलेल्या ठराबाबत महासंघाचे वतीने शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करून समाजाला न्याय मिळवून देण्यात येईल,तसेच दिनांक 8/8/2024 पून्हा जंतर मंतर दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात आले.हे विशेष.
वसतिगृहाबाबत शासनाचे महासंघाला दिलेले लेखी आश्वासनचा शब्द पाळला त्या बद्दल आयोगाचे अध्यक्ष, मंत्री महोदय, खासदार,आमदार यांचे, व ज्या ज्या ओबीसी व्हीजेएनटी, एसबीसी बंधू भगिनींनी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या इतरही समाज बांधवांचे व सहकार्य करणाऱ्यांचे सर्वांचे अभिनंदन तसेच समाजासाठी अहोरात्र, अविरत 9 वर्षापासून झटणारे निःस्वार्थी दोन्ही ओबीसी नेते,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय डॉ बबनरावजी तायवाडे साहेब व सचिन राजुरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी यांचे सुध्दाअभिनंदन
या कार्याबद्दल श्याम लेडे, सतीश वारजूकर धनराज मुंगले,मनोज गौरकर, रामराव हरडे, भावना बावनकर, मनिषा बोबडे, बालू सातपुते,अशोक टिपले,देवराव दिवसे, प्रदीप पावडे, राजु हिवंज, सुनिल बरीले, दत्तू भुसारी, चंपत डंभारे, अशोक सोंनटक्के, माधव डुकरे,लिलाधर तिवाडे, श्रीकृष्ण लोनबले, रामदास कामडी, कवडू लोहकरे, कालिदास येरगुडे, जितेंद्र बल्की, राजू घोडमारे, कवडू मत्ते, सुधाकर ठाकरे, मनोज बेले,, रजनी मोरे, पौर्णिमा मेहरकुरे, मारोती अतकरे, ममता डुकरे, माधुरी रेवतकर,यांनी वरील सर्वांचे अभिनंदन केले.